व्हीपीकेबीआयईटी, बारामतीला ‘कॉन्टेंडर’ दर्जाचा राष्ट्रीय बहुमान; ऑनलाईन शिक्षणातील उल्लेखनीय कामगिरीची दखल
१,३७१ प्रमाणपत्रे मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

व्हीपीकेबीआयईटी, बारामतीला ‘कॉन्टेंडर’ दर्जाचा राष्ट्रीय बहुमान; ऑनलाईन शिक्षणातील उल्लेखनीय कामगिरीची दखल
१,३७१ प्रमाणपत्रे मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (व्हीपीकेबीआयईटी), बारामती या संस्थेला शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये आयआयटी मद्रास यांच्या एनपीटीईएल ॲक्टिव्ह लोकल चॅप्टर उपक्रमांतर्गत “कॉन्टेंडर” हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय दर्जा प्रदान करण्यात आला.
हा सन्मान दि. २५ जुलै २०२६ रोजी आयआयटी बॉम्बे येथे आयोजित एनपीटीईएल गौरव समारंभात संस्थेने स्वीकारला. यंदाच्या शैक्षणिक वर्षात संस्थेने ७,००९ प्रवेश नोंदणी, २,२७९ परीक्षा नोंदणी, २,०२८ परीक्षाउपस्थिती आणि १,३७१ प्रमाणपत्रे मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षण, स्वयंअध्ययन, कौशल्यविकास आणि जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयाने सातत्याने विविध उपक्रम राबविले. त्याचा परिणाम म्हणून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एनपीटीईएल अभ्यासक्रमांमध्ये सहभाग नोंदवून गुणवत्तापूर्ण यश मिळविले.
या उल्लेखनीय यशामागे संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ, प्राचार्य डॉ. एस. बी. लांडे, तसेच अधिष्ठाता, विभागप्रमुख, एनपीटीईएल मार्गदर्शक प्राध्यापक, एनपीटीएलचे विभागीय समन्वयक
श्री. प्रदीप पाटील व श्री. सचिन लोणकर – माहिती तंत्रज्ञान,
कु. गौरी भेलोंडे – संगणक अभियांत्रिकी
श्री. प्रदीप शेंडगे – कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स, श्री. दीपक भोसले – यांत्रिकी अभियांत्रिकी
श्री. दिपक येवले – विद्युत अभियांत्रिकी
श्री. दिलीप पाटील – स्थापत्य अभियांत्रिकी
सौ. वर्षा सुरवसे – इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी
डॉ. अनिल पाटील – प्रथम वर्ष तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि प्रभावी समन्वय यांचा मोलाचा वाटा आहे.
मार्गदर्शक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासक्रमांची निवड, नियमित अध्ययन, परीक्षेची तयारी आणि प्रमाणपत्र प्राप्तीसाठी केलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळाले आहे.
हा राष्ट्रीय बहुमान संस्थेच्या गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, डिजिटल शिक्षण संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कौशल्यविकासासाठी असलेल्या वचनबद्धतेचा गौरव मानला जात असून, भविष्यातही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्ञानसंधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा निर्धार असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.







