शिंदे पिता-पुत्रांची बारामतीला दिवाळी भेट! ‘आई पर्यटन योजने’तून पवार कुटुंबाला कार!
महिलांना केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी

शिंदे पिता-पुत्रांची बारामतीला दिवाळी भेट! ‘आई पर्यटन योजने’तून पवार कुटुंबाला कार!
महिलांना केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी
बारामती वार्तापत्र
दिवाळीच्या सणात बारामती तालुक्यातील एका पवार कुटुंबासाठी आनंदाची अनोखी भेट मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने ‘आई पर्यटन योजने’अंतर्गत तरडोली येथील पवार कुटुंबाला टोयोटा रुमियन ही चारचाकी गाडी भेट देण्यात आली. दिवाळीच्या निमित्ताने मिळालेल्या या वाहनामुळे पवार कुटुंबाच्या आनंदात भर पडली आहे.
बारामती तालुक्यातील मोरगाव परिसरातील तरडोली येथील पवारवाडीच्या रहिवासी सौ. प्रियांका महेंद्र पवार या ‘आई पर्यटन योजने’च्या लाभार्थी ठरल्या आहेत. ठाणे येथील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी या वाहनाचे वितरण करण्यात आले. यावेळी शिंदे पिता-पुत्रांच्या वतीने लाभार्थी कुटुंबाला वाहनाची चावी सुपूर्द करण्यात आली.
महिलांना केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेमागील उद्देश आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रजी जेवरे आणि त्यांचे सहकारी ‘आई पर्यटन योजने’ची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जनजागृती केली जात आहे.
दिवाळीच्या निमित्ताने मिळालेली ही चारचाकी भेट प्रियांका पवार यांच्या कुटुंबासाठी आनंदाची ठरली असून, पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबनाच्या दिशेने नवे पाऊल टाकण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
लाभार्थी महिलेची माहिती
- नाव : सौ. प्रियांका महेंद्र पवार
- गाव : पवारवाडी, तरडोली
- तालुका : बारामती
- योजनेचे नाव : आई पर्यटन योजना
- वाहन : टोयोटा रुमियन






