स्थानिक

सुनेत्रा पवारांसाठी विवेक ओबेरॉयची मराठीतून पोस्ट, म्हणाला ‘सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!’

जो ऐतिहासिक विजय नोंदवला आहे, ही एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे

सुनेत्रा पवारांसाठी विवेक ओबेरॉयची मराठीतून पोस्ट, म्हणाला ‘सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!’

जो ऐतिहासिक विजय नोंदवला आहे, ही एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामती पोटनिवडणुकीत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २.१८ मतांनी विजय मिळवला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.

पण, २२ उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडली आणि सुनेत्रा पवार विजयी झाल्या. अशातच आता सुनेत्रा पवार यांच्या विजयावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयनं खास पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर या पोस्टच्या शेवटी अभिनेत्यानं मराठीमध्ये एक ओळसुद्धा लिहिली आहे.

विवेक ओबेरॉयची पोस्ट

विवेक ओबेरॉयनं इन्स्टाग्रामवर सुनेत्रा पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘सुनेत्रा वहिनी, अजित दादांचं अस्तित्व, त्यांचं नाव, त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक बारामतीकरांच्या मनात कायम राहणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तुम्ही जो ऐतिहासिक विजय नोंदवला आहे, ही एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे.

दादांनी राबवलेले विविध उपक्रम, त्यांचं सामान्य लोकांवर असलेलं प्रेम आणि त्यांची जिद्द यामुळेच ते खरे ‘लोकनेते’ म्हणून ओळखले जात होते आणि आज त्यांच्या अर्धांगिनीवर जनतेनं दाखवलेला विश्वास हेच सिद्ध करतो की, त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी तुम्हीच योग्य वारसदार आहात.’

महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ

‘तुम्हाला या नव्या प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! महाराष्ट्रासाठी हा नक्कीच सुवर्णकाळ ठरेल…कारण, ‘सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!’ असं विवेकनं शेवटी म्हटलं आहे.

Back to top button