बारामती मधील कोरोनाग्रस्तांचा मृत्यू दर कमी करण्याचे आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान डॉ. मनोज खोमणे.
बारामती तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याकरिता उपाययोजना करण्याची होऊ लागली मागणी.

बारामती वार्तापत्र
बारामतीतील आज दि.30 जुलै पर्यंत रुग्णांची संख्या 129 वर जाऊन पोहोचली असून एकूण 12 मृत्यू आहेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 62 इतकी असून सध्या 55 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून एकूण रुग्ण संख्येपैकी झालेल्या मृत्यूचा दर जास्त असल्यामुळे आता बारामतीकरांना मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
शेजारील तालुक्यांची कोरोनाची परिस्थिती पाहता बारामती तालुक्यातील कोरोनाची संख्या आटोक्यात राहिली असून त्याचे मुख्य कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी घेतलेल्या आढावा बैठका केलेल्या सूचना.
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे प्रशासनानेही मान्य केले आहे. या साठी आता प्रभावी उपाययोजना करण्याचे नियोजन सुरु झाले असून आजपर्यंत झालेल्या प्रत्येक मृत्यूचा अभ्यास केला जाईल. रुग्णांनी प्राथमिक लक्षणे आढळताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे असे मत वैद्यकीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी व्यक्त केले आहे.