सासरच्यांच्या जाचाला कटाळून पुण्यातील निखिल धोत्रे या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते.

सासरच्यांच्या जाचाला कटाळून पुण्यातील निखिल धोत्रे या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते.
क्राईम;बारामती वार्तापत्र
पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर भागातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे या तरुणाने काल (22 ऑगस्ट) आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या तरुणाचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. तरुणाजवळ सुसाईड नोटही सापडली असून त्यात त्याने सासरच्यांच्या जाचाला कटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण आता या प्रकरणाची आणखी दुसरी बाजू समोर आली आहे. मृतक तरुणाच्या पत्नीने त्याच्या मृत्यूआधी फिनायल पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.
मृतक निखिलच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी शौचालय स्वच्छ करण्याचे औषध पिल्याचे समोर आलं आहे. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार केले गेले असून ती गर्भवती देखील आहे, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. दुसरीकडे निखिल मानसिक तणावात असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे त्याचे मित्र सांगत आहेत.