ह.भ.प.निवृत्ती महाराजांना मी स्वतः वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईल: आरोग्यमंत्री राजेश टोपे
मी स्वतः वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन असे प्रतिपादन आरोग्यमंत्री
ह.भ.प.निवृत्ती महाराजांना मी स्वतः वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईल: आरोग्यमंत्री राजेश टोपे
मी स्वतः वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन असे प्रतिपादन आरोग्यमंत्री
बारामती वार्तापत्र
मी स्वतः कोरोनाची लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही, असे वक्तव्य करणाऱ्या निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना मी स्वतः वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले
बारामतीत बुधवारी (३ नोव्हेंबर) ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गोविंदबाग येथे भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी लसीकरणाविरोधात नुकतेच वक्तव्य केले. मी स्वतः लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही असे ते नाशिकमध्ये एका किर्तनात म्हणाले. त्यावर आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिले.
कोविडवर लस प्रभावशाली आहे, त्या मुळे रक्षण होते व लस कवचकुंडलांसारखेच काम करते, लस घेतल्यानंतर कोरोना होतच नाही असे नसले तरी लस घेतल्याने शरीरात अँटीबॉडीज तयार होतात ही बाब सिध्द झाली आहे, त्या मुळे प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.
आरोग्यमंत्री म्हणाले, प्रबोधनकार-किर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख हे माझ्या अत्यंत परिचयाचे आहेत. ते ज्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात. समाजाला किर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात, तो त्यांच्या स्टाईलमुळे लोकांना भावतो. त्यामुळे नागरिक त्यांच्या किर्तनाला मोठी गर्दी करतात. त्यांनी लसीसंबंधी असे वक्तव्य केले असेल तर मी त्यांच्याशी नक्की बोलने. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे किर्तनावर बंधने होती. आता किर्तने सुरु झाली आहेत. महाराजांचे व माझे प्रेमाचे, विश्वासाचे संबंध आहेत. महाराजांनी स्वतःला जरुर प्रोटेक्ट केलेले असेल किंवा मास्क, सोशल डिस्टन्सींग अशी काळजी ते घेत असतील. परंतु प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.
राज्यात सात कोटी नागरिकांना मिळाला पहिला डोस
राज्यात आतापर्यंत सात कोटी नागरिकांना पहिला डोस तर तीन कोटी नागरिकांना दुसरा डोस दिल्याची माहिती टोपे यांनी दिली. पहिल्या डोसचे 73 तर दुस-या डोसचे 34 टक्के उद्दीष्ट राज्याने पूर्ण केले आहे. राज्य सरकार रुग्ण किंवा मृत्यू या दोन्ही बाबतचे आकडे पारदर्शकतेने देत आहे, यात आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र व राज्याच्या आकडेवारीत जर काही फरक असेल तर जुळवणी करण्याचे काम केले जाईल. को–विन अॅपवर अत्यंत पारदर्शीपणे अपडेटेड डेटा असतो. त्याला डेटाच्या अनुषंगानेच आकडेवारी तयार होते. कोविडच्या काळात आकड्यांबाबत कधीही चुकीची माहिती आम्ही दिलेली नाही. रुग्णांचे आकडे असोत कि मृत्यूचे असोत की आता लसीकरणाचे असो. पारदर्शकता आणि प्रामाणिकता हा आमचा मूल सिद्धांत राहिला आहे. त्यामुळे आमचे आकडे नेहमीच बिनचूक असतात. त्यात कुठेही दिशाभूल कऱण्याचा विषय येत नाही असेही टोपे यांनी स्पष्ट केले.