ऊस वाहतूक करताना चालकांनी शिस्त पाळावी : पोलीस निरीक्षक महेश ढवाण
अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

ऊस वाहतूक करताना चालकांनी शिस्त पाळावी : पोलीस निरीक्षक महेश ढवाण
अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
बारामती वार्तापत्र
ऊस वाहतूक करताना चालकांनी शिस्त पाळावी.रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करताना रस्त्याच्या कडेला कोणतेही वाहन उभे करू नये.असे निर्देश तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिले आहे.
माळेगाव साखर कारखाना या ठिकाणी ऊस वाहतूकदार बैलगाडा व ट्रॅक्टर चालकांसाठी आज मार्गदर्शक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. प्रत्येक वर्षी साखर कारखान्याच्या हंगामामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना धडकून अनेक अपघात झाले आहेत.
त्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे माळेगाव साखर कारखाना येथे बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, माळेगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे व माळेगाव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगताप यांच्या उपस्थितीत ऊस वाहतूकदार बैलगाडा व ट्रॅक्टर चालकांसाठी मार्गदर्शक बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ढवाण बोलत होते.
पुढे बोलताना पोलीस निरीक्षक महेश ढवाण म्हणाले की, सर्वांनी ऊस वाहतूक करताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असून ऊस वाहतूकदार वाहनांना रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करताना रस्त्याच्या कडेला कोणतेही वाहन उभे करू नये. ऊस वाहतूक करताना चालकांनी शिस्त पाळावी. ट्रॅक्टर मध्ये ओव्हरलोड वाहतूक करू नये वगैरे सूचना दिल्या.
माळेगाव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगताप यांनी ऊस वाहतूकदार वाहनांना रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक असल्याचे सांगून ज्या वाहनांना रिफ्लेक्टर नसेल ते वाहन खाली करून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट आदेश वाहतूकदार चालकांना दिले आहेत. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऊस वाहतूकदार वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याचा कार्यक्रम देखील पार पडला.