अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन साजरा
सामाजिक एकता व नेतृत्वगुणांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे

अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक दिन साजरा
सामाजिक एकता व नेतृत्वगुणांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे
बारामती वार्तापत्र
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव बु. येथे ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांची शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, डॉ. राहुल मुनगीकर, संस्था व्यवस्थापन समिती सदस्य वैभव सोलणकर, किशोर जोशी, राजेश लोंडे आदी उपस्थित होते.
श्री.नावडकर यांनी शिवछत्रपतींच्या कार्याचा गौरव करुन ते पुढे म्हणाले, थोर पुरुषांचे विचार तरुणांपर्यंत पोहोविण्याची गरज आहे. या विचारातून विचार अंगीकरण्याच्यादृष्टीने थोर महापुरुषांच्या जयंती व इतर कार्यक्रम आयोजित करावे, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. राहुल मुनगीकर यांनी आपल्या भाषणातून युवकांना शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी ‘पर्यावरण संरक्षण’ या विषयासोबतच कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य व शिष्टाचार, स्वदेशी विचारांचा प्रसार या पंचसुत्रीवर मार्गदर्शन केले.
श्री. सोलणकर म्हणाले, सामाजिक एकता व नेतृत्वगुणांच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे,असे ते म्हणाले.
यावेळी श्री जोशी, श्री. लोंडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
श्री. संतोष सपकळ यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत जाधव यांनी केले.