बारामतीच्या टी.सी. कॉलेजमध्ये ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ योजनेतून प्रशिक्षणाची दमदार सुरुवात”
उपक्रमाचे हे पहिले वर्ष

बारामतीच्या टी.सी. कॉलेजमध्ये ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ योजनेतून प्रशिक्षणाची दमदार सुरुवात”
उपक्रमाचे हे पहिले वर्ष
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील बी.बी.ए. (सी.ए.) विभागाने क्विकहिल फाउंडेशन सोबत ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या योजनेअंतर्गत सायबर सुरक्षेवरील विशेष उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाचे हे पहिले वर्ष असून, यामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यासोबतच सायबर सुरक्षेबाबत समाजात जनजागृती करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. या सामंजस्य करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश एस. जगताप आणि क्विकहिल फाउंडेशनचे श्री. अजय शिर्के यांनी नुकतीच स्वाक्षरी केली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सखोल जागरूकता निर्माण करणे, तसेच समाजातील विविध घटकांमध्ये जाऊन जनजागृती करणे हा आहे. विद्यार्थ्यांना विविध शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन सायबर सुरक्षेबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच विध्यार्थ्यांना सदर उपक्रमा अंतर्गत ‘कमवा आणि शिका’ या माध्यमातून आर्थिक मदत हि होणार आहे.
या उपक्रमाची अंमलबजावणी क्विकहिल फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. क्विकहिल फाउंडेशनच्या पुणे येथील कार्यालयात शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा दि. ११ जुने २०२५ रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेदरम्यान क्विकहिल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अनुपमा काटकर, अजय शिर्के आणि गायत्री केसकर यांनी सायबर गुन्हे, त्यावरील उपाय व सायबर सुरक्षेची माहिती दिली. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये मोहीम कशी राबवावी याचे मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये क्लबचे अध्यक्ष, अभय साहू, सचिव संदीप माने, गतिविधी संचालक ज्योती गुरव, मीडिया संचालक सायली ढगे तसेच क्लब शिक्षक प्रा. सलमा शेख यांनी सहभाग नोंदवला. सदर करारासाठी माधुरी सस्ते विभागप्रमुख, रेश्मा बाबर, अश्विनी भोसले, दत्तात्रय आरडे, तृप्ती भोसले, शशिकांत नकाते यांनी विशेष मेहनत घेतली.