बारामतीत लाच मागिल्याप्रकरणी एसीबीने पोलिस हवालदारावर केला गुन्हा दाखल
३० हजार रुपयांची लाच मागितली होती

बारामतीत लाच मागिल्याप्रकरणी एसीबीने पोलिस हवालदारावर केला गुन्हा दाखल
३० हजार रुपयांची लाच मागितली होती.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात कार्यरत हवालदाराने लाच मागितल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली असून, आरोपी पोलिस हवालदार रमेश लक्ष्मण नागटिळक (वय ४२) याला ताब्यात घेतले आहे.
तक्रारीनुसार, एका महिलेच्या मुलाविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या जामीनासाठी आणि चार्जशीट लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी हवालदार नागटिळक यांनी सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. नंतर तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित झाली.तक्रारदाराने १८ जानेवारी रोजी ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. यानंतर तपास करून एसीबीने सापळा रचला. शनिवारी (दि. ३१) हवालदार नागटिळक याने ठरवलेल्या रकमेची मागणी केली Pune ACB action तेव्हा त्याला ताब्यात घेतले.या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.






