जेजुरी

जेजुरी गडावर शर्यतीचा बैल उधळला; भाविकांची पळापळ – प्रकार सीसीटीव्हीत कैद

बैल उधळताच गडावरील पायऱ्या आणि परिसरात एकच गोंधळ उडाला

जेजुरी गडावर शर्यतीचा बैल उधळला; भाविकांची पळापळ – प्रकार सीसीटीव्हीत कैद

बैल उधळताच गडावरील पायऱ्या आणि परिसरात एकच गोंधळ उडाला

बारामती वार्तापत्र

जेजुरी गडावर मंगळवारी एक अनपेक्षित प्रकार घडल्याने भाविकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले. दर्शनासाठी आणण्यात आलेला शर्यतीचा बैल अचानक उधळल्याने गडावर उपस्थित असलेल्या भाविकांची एकच धावपळ उडाली.

शर्यतीची ही बैलं दर्शनासाठी जेजुरी गडावर आणण्यात आली होती. दर्शन सुरू असतानाच अचानक एका बैलाने नियंत्रण सुटून उधळ घेतली. बैल उधळताच गडावरील पायऱ्या आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. स्वतःचा बचाव करण्यासाठी भाविकांनी सैरावैरा पळ काढला.

या गोंधळात अनेक भाविक पायऱ्यांवरून घसरून पडल्याचे दृश्य गडावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाल्याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही, मात्र काही भाविकांना किरकोळ मार लागल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेनंतर मंदिर प्रशासन आणि स्थानिकांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. बैलाला आवर घालण्यात आल्यानंतर परिस्थिती शांत झाली. मात्र या घटनेमुळे काही काळ गडावरील दर्शन व्यवस्था विस्कळीत झाली होती.

दरम्यान,सार्वजनिक ठिकाणी शर्यतीची बैलं आणताना योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणीही करण्यात येत आहे.

Back to top button