शैक्षणिक

तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,  बारामतीतील प्रा.डॉ.सचिन नामदेव गाडेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार’ प्रदान

एकूण 25 संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत.

तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,  बारामतीतील प्रा.डॉ.सचिन नामदेव गाडेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार’ प्रदान

एकूण 25 संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत.

बारामती वार्तापत्र

तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,  बारामती  येथील  उपप्राचार्य व इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ.सचिन नामदेव गाडेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार, (अव्यावसायिक ग्रामीण विभाग) प्राप्त झाला आहे. दिनांक १० फेब्रुवारी २०२६  रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७७ व्या  वर्धापन – दिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमामध्ये मा.कुलगुरू प्रा.डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पराग काळकर व मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पुरस्कारार्थी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, रजिस्ट्रार अभिनंदन शहा हे उपस्थित होते.

प्रा.डॉ.सचिन नामदेव गाडेकर हे गेल्या वीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून नेट, सेट, एम फिल.,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून  पीएच.डी. पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. हैद्राबाद येथील नामांकित इंग्लिश अँड फॉरेन लँगवेजेस युनिव्हर्सिटी येथून पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन टिचिंग इंग्लिश’ व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टिचिंग इंग्लिश हे कोर्सेस पूर्ण केले आहेत.

डॉ.गाडेकर यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून ती प्रेस्टीज बुक्स इंटरनॅशनल, नवी दिल्ली व इकपिरॉसिस प्रेस, मिशीगन, अमेरिका या नामांकित प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत.

त्यांनी तीन रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केले असून ज्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अर्थसहाय्य केले व  भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च अंतर्गत ‘इम्पॅक्टफुल पॉलिसी रिसर्च इन सोशल सायन्सेस’ अंतर्गत भारतीय महिला नाटककारांची इंग्रजी नाटके या विषयावर संशोधन केले आहे. तसेच त्यांचे नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये एकूण 25 संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये २७ शोधनिबंधाचे वाचन केले असून ज्यामध्ये प्रामुख्याने युनिव्हर्सिटी ऑफ रोम, इटली, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, थायलंड, शाहजलाल युनिव्हर्सिटी, बांग्लादेश, व रॉयल युनिव्हर्सिटी भुतान इत्यादी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये त्यांनी त्यांचे संशोधन सादर केले आहे.

प्रा.डॉ.सचिन गाडेकर यांचेकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शन म्हणून  एकूण आठ विद्यार्थी संशोधन करीत आहेत. जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या ‘द इन्स्टिट्यूट फॉर क्रिटिकल सोशल थेअरी’ अमेरिका या संस्थेवर सन्माननीय सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत तर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात उपप्राचार्य, अकॅडेमिक कौंसिलचे सदस्य, अभ्यास मंडळाचे सदस्य, महाविद्यालय सुधार समिती, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्ष, स्कॉलरशिप सेलचे नोडल अधिकारी, आत्महत्या प्रतिबंध कक्षाचे प्रमुख इ. पदांवर कार्यरत आहेत.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांचे संपादक म्हणून देखील कार्यरत आहेत त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले असून ज्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘यंग टीचर ट्रॅव्हल ग्रँट’  ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स’ यांचा समावेश आहे.

त्यांनी विद्यापीठांच्या अनेक कमिट्यांवर काम केले असून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून तीन वर्षे काम केले आहे. ‘भारतीय व पाश्चात्य साहित्य व कल्चरल मेमरी स्टडीज व भारतीय ज्ञान परंपरा’ हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.

प्रा.डॉ.सचिन नामदेव गाडेकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), पदाधिकारी, सर्व सदस्य, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, विभागप्रमुख प्रा.डॉ.अजय ढवळे, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक,  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी  यांनी अभिनंदन केले आहे.

Back to top button