जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात श्री समर्थ दासबोध पारायण सोहळा संपन्न…
दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जात
जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात श्री समर्थ दासबोध पारायण सोहळा संपन्न…
दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जात
बारामती वार्तापत्र
बारामती येथील जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात दिनांक ०३ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री समर्थ दासबोध पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी दासबोध ग्रंथाचे वाचन केले.
दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जात असून पारायण सोहळ्याचे यंदाचे सतरावे वर्ष आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.
विद्यालयाचे अध्यापक श्री. अजित रेवडे दरवर्षी व्यासपीठ चालक म्हणून काम पाहतात.
सदर पारायण सोहळ्यास मा.सौ. जयश्री दाते, मा. सौ. शुभांगी महाडिक, अॅड.मा.श्री. नंदकुमार भागवत, मा.श्री. सचिन नाळे, मा.श्री. निलेश भोंडवे, मा.श्री. हनुमंत दुधाळ, मा.श्री. अजित रेवडे इ. मान्यवरांनी निरुपण केले.
पारायण सोहळ्याचा सांगता समारंभ दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाला. दुपारी १२ वा. संस्थेच्या स्नातक विद्यार्थिनी कु. सिद्धी दाते व कु. वेदिका दाते यांच्या हस्ते व सर्व विद्यार्थी, अध्यापक, दादा, ताई यांच्या उपस्थितीत आरती संपन्न झाली.
यादिवशी विद्यालय व विद्यालयाचे पालक मा.श्री. राजेश दाते यांचे तर्फे प्रसादाची व्यवस्था करण्यात आली.
सदर समर्थ दासबोध पारायण सोहळ्याच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी प्रा.मा.श्री. रवींद्र आगवणे (माजी उपप्राचार्य, तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालय, बारामती) व मा.श्री. अजित रेवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.






