इंदापूर

इंदापूर-बारामती पालखी महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको

सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात.

इंदापूर-बारामती पालखी महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको

सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात.

इंदापूर;प्रतिनिधि

इंदापूर-बारामती महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे आतापर्यंत २५ हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरी देखील पालखी महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर इंदापूर व तरंगवाडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत पालखी महामार्ग रोखून आंदोलन केले. महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे, सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात आणि पुढील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच इंदापूरचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रश्नात लक्ष घालून काम लवकर पूर्ण करावे.. अशी मागणीही करण्यात आली आहे..

Back to top button