बारामती बाजार समिती मध्ये हमीभावाने हरभरा खरेदी साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू
स्वच्छ असलेला हरभरा प्रति एकर २.५० क्विंटल प्रमाणे FAQ दर्जाचा खरेदी करणेत येणार

बारामती बाजार समिती मध्ये हमीभावाने हरभरा खरेदी साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू
स्वच्छ असलेला हरभरा प्रति एकर २.५० क्विंटल प्रमाणे FAQ दर्जाचा खरेदी करणेत येणार
बारामती वार्तापत्र
शेतक-यांना योग्य दर मिळावा आणि बाजारभावातील चढउतारांपासुन संरक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभुत किंमत योजने अंतर्गत हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणेत आले असुन ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. १ मार्च २०२६ पासुन सुरू करण्यात आली आहे.
शेतक-यांना हमीभावाने शेतमाल विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, हा किमान आधारभुत किंमत योजनेचा मुख्य उद्देश आहे. बारामती बाजार आवारात लिलावात सर्वसाधण दर्जा असलेल्या हरभ-याचे दर हमीभावा पेक्षा कमी निघत असल्याने शासनाकडे मागणी केली होती.
त्यानुसार हरभरा (चना) खरेदी केंद्र मंजुर झाल्याचे मार्केटींग फेडरेशन, पुणे यांनी कळविलेल्या नुसार ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया दि ३१ मार्च २०२६ पर्यन्त निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे हरभरा ऑनलाईन नोंदणी निरा कॅनॉल संघ, बारामती येथे मुदतीत करून खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे सभापती विनायक गावडे व उपसभापती अरूण सकट यांनी केले आहे.
बारामती तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतक-यांनी रब्बी हंगाम २०२६ मधील हमीभावाने हरभरा खरेदीची ऑनलाईन नोंदणी १ मार्च २०२६ पासुन सुरू झाली असल्याची माहिती बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघाचे चेअरमन सतिश काकडे यांनी सांगितले.
सध्या बाजार आवारात हरभ-याचे दर प्रति क्विंटल सरासरी रू. ४९००/- तर कमाल रू. ५१००/- असे निघत आहेत. केंद्र शासनाने हरभ-याचा हमीदर रू.५८७५/- असा निश्चित केला असल्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेल्या शेतक-यांचा हरभरा खरेदी करणेत येणार आहे.
शासनाचे निकषा नुसार वाळलेला व स्वच्छ असलेला हरभरा प्रति एकर २.५० क्विंटल प्रमाणे FAQ दर्जाचा खरेदी करणेत येणार आहे. त्यासाठी ७/१२ उतारा, सन २०२५-२६ चा पिकपेरा हरभरा नोंद, आधारकार्ड आणि IFSC कोड सह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी संपुर्ण कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांना एसएसएम द्वारे मेसेस आलेवर बारामती मुख्य यार्ड वरील यांत्रिक चाळणी खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीस आणावा अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.






