क्राईम रिपोर्ट

बारामतीत नामांकित हॉस्पिटलमध्ये १५ लाखांची धाडसी चोरी; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू

सुरक्षित लॉकिंग सिस्टीम व अलार्म सिस्टीमचा वापर करावा

बारामतीत नामांकित हॉस्पिटलमध्ये १५ लाखांची धाडसी चोरी; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू

सुरक्षित लॉकिंग सिस्टीम व अलार्म सिस्टीमचा वापर करावा

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात पुन्हा एकदा चोरीची धाडसी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक १३ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास भिगवण रोड परिसरातील “प्रिझ्मा आय केअर” हॉस्पिटलमध्ये अज्ञात चोरट्याने शिरून तब्बल १५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील ग्रॅनाईटची चौकट तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आत ठेवलेले ड्रॉवर उचकटून त्यामध्ये ठेवलेली सुमारे ₹१५,००,००० (पंधरा लाख) रोख रक्कम लंपास केली.

सकाळी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी कर्मचारी आले असता दरवाज्याची तोडफोड आणि ड्रॉवर उघडलेले दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तत्काळ पोलीसांना याची माहिती देण्यात आली.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक ९७/२०२६ अंतर्गत कलम ३३१(३) व ३०५ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलीसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच विशेष पथक तयार करून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलीसांनी नागरिक, व्यापारी, हॉस्पिटल, क्लिनिक व दुकानदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहन व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दुकान किंवा कार्यालयात ठेवणे टाळावे.
परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते नेहमी कार्यरत ठेवावेत.
सुरक्षित लॉकिंग सिस्टीम व अलार्म सिस्टीमचा वापर करावा.
रात्रीच्या वेळी शक्य असल्यास सुरक्षा रक्षक ठेवावा.
संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

व्यापाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून परिसरावर लक्ष ठेवावे.
बारामती शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित बारामती शहर पोलिस स्टेशन किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button