स्थानिक

भयानक!बारामतीत सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट; एक महिला व दोन लहान मुले गंभीर जखमी

या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

भयानक!बारामतीत सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट; एक महिला व दोन लहान मुले गंभीर जखमी

या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या कसब्या परिसरातील साठे नगर येथे सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून,या दुर्घटनेत एक महिला व दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,साठे नगर येथील रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की, जवळ असलेल्या नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला.या घटनेत जखमी झालेल्या एका महिलेवर भोईटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, दोन लहान मुलांना मुथा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सुनील सस्ते,संबंधित प्रभागातील पदाधिकारी,तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे आणि नगराध्यक्ष सचिन सातव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या.

प्राथमिक माहितीनुसार,सेफ्टी टँकची नियमित साफसफाई न झाल्यामुळे त्यामध्ये ज्वलनशील वायू साचला असावा आणि त्यातूनच हा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.?

या घटनेमुळे बारामती नगरपरिषदेच्या सार्वजनिक सुविधांच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.तसेच,या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

Back to top button