विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बारामतीत बैठक संपन्न
बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बारामतीत बैठक संपन्न
बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला
बारामती वार्तापत्र
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शारदा प्रांगण येथील पक्ष कार्यालयात पार पडली.
ही बैठक बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. ॲड. किरण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात संघटनात्मक बांधणी, नियोजन तसेच विविध जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, आजी-माजी नगरसेवक, विविध संस्था व सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी, बूथ कमिटीतील सर्व पदाधिकारी, समन्वयक, युवक तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला असून, प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी निवडणुकीत बारामतीत पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





