बारामतीत प्रशासनिक बदल; वैभव नावडकर बदली, उत्तम दिघे नवे उपविभागीय अधिकारी
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण

बारामतीत प्रशासनिक बदल; वैभव नावडकर बदली, उत्तम दिघे नवे उपविभागीय अधिकारी
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण
बारामती वार्तापत्र
बारामती उपविभागीय कार्यालयात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. विद्यमान उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मिरजचे उत्तम दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासकीय आदेशानुसार दिघे यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार असल्याने प्रशासनात हालचालींना वेग आला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
वैभव नावडकर यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून त्यांच्या काळात प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले होते. त्यांच्या बदलीमुळे प्रशासनात काही प्रमाणात बदल होणार असला तरी नव्याने नियुक्त झालेले उत्तम दिघे यांच्याकडून कामकाज अधिक वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वैभव नावडकर यांची पुढील नियुक्ती अद्याप जाहीर झालेली नसून लवकरच त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







