राजकीय

युवानेते श्री जयदादा अजितदादा पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला बारामतीत उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांची मोठी गर्दी

संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दूरध्वनीद्वारे सूचना देत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले.

युवानेते श्री जयदादा अजितदादा पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला बारामतीत उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांची मोठी गर्दी

संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दूरध्वनीद्वारे सूचना देत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले.

बारामती वार्तापत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते श्री जयदादा अजितदादा पवार यांनी आज बारामती येथे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी जनता दरबाराची सुरुवात केली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आपल्या विविध समस्या जय पवार यांच्यासमोर मांडल्या.

जनतेच्या अडचणी समजून घेत श्री जय अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दूरध्वनीद्वारे सूचना देत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला.

दिव्यांगांच्या समस्या तत्काळ मार्गी

दिव्यांग बांधवांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना आवश्यक सहकार्याचे आश्वासन दिले.

प्रश्नांचे त्वरित निराकरण झाल्यानंतर उपस्थित दिव्यांग बांधवांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “जय पवार यांच्यामध्ये आम्हाला दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांचेच प्रतिबिंब दिसते. ज्याप्रमाणे अजितदादा आमच्या भावना समजून घेत तत्काळ मदत करायचे, त्याचप्रमाणे जय पवार यांनीही आमच्या अडचणी समजून घेत त्वरित निर्णय घेतला.”

जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य नागरिक, दिव्यांग व मूकबधिर बांधवांच्या प्रश्नांना प्राधान्य देत तत्काळ कार्यवाही करण्याची भूमिका जय पवार यांनी पुन्हा अधोरेखित केली.

बारामतीतील नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी श्री जय अजितदादा पवार जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार आहेत.

Back to top button