मुंबई

बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई-पुणे महामार्गावर अपघात;सीटबेल्ट लावल्याने अनर्थ टळला

''तुम्ही कसं वाहन चालवता, यावर अपघात अवलंबून नसतो.. समोरचा चालक बेफिकीर असू शकतो.

बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई-पुणे महामार्गावर अपघात;सीटबेल्ट लावल्याने अनर्थ टळला

”तुम्ही कसं वाहन चालवता, यावर अपघात अवलंबून नसतो.. समोरचा चालक बेफिकीर असू शकतो.

बारामती वार्तापत्र

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई-पुणे महामार्गावर किरकोळ अपघात झाला आहे. याबाबत त्यांनी स्वतः X या सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

तसंच, ज्या वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली त्या वाहनाचा नंबर प्लेटही सुप्रिया सुळेंनी शेअर केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर GJ13CF5257 या वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे माझ्या गाडीला बाजूने धडक दिली.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘हा एक अत्यंत वाईट अनुभव होता. सुदैवाने, सर्वजण सुरक्षित आहेत. अशा घटना हा एक गंभीर इशारा आहे की, आपल्या रस्त्यांवरील अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना आवाहन करते की, सीट बेल्ट लावा, सतर्क राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा, जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित राहतील.’

हेमंत सवरा यांच्या गाडीलाही झाला होता अपघात

१ मे रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर जवळच्या रस्त्यावर पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या गाडीचा अपघात झाला होका. खासदार यांची गाडी विरुद्ध दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रकची धडक बसल्याने हा अपघात घडला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली असून खासदार सावरा व त्यांच्यासोबत असलेले सहकारी हे सुखरूप आहेत.

Back to top button