स्थानिक

बारामतीमध्ये युवा नेते युगेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून शरयू फाउंडेशनतर्फे दोन दिवसीय “भूमी उत्सव 2026” प्रदर्शनाचे आयोजन

प्रदर्शनामुळे महिलांना आपल्या उत्पादनांचे सादरीकरण करण्याची संधी

बारामतीमध्ये युवा नेते युगेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून शरयू फाउंडेशनतर्फे दोन दिवसीय “भूमी उत्सव 2026” प्रदर्शनाचे आयोजन

प्रदर्शनामुळे महिलांना आपल्या उत्पादनांचे सादरीकरण करण्याची संधी

बारामती वार्तापत्र 

शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन पार पडले.बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उन्हाळी गृहपयोगी पदार्थांना विक्रीचे व्यासपीठ मिळावे तसेच महिलांना आर्थिक मोबदला मिळावा, या उद्देशाने शरयू फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे.

परिसरातील शेतकरी महिला व महिला बचत गटांना लघुउद्योजकतेसाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. तसेच महिलांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तू व पदार्थांची खरेदी करून बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्यात आले.

या प्रदर्शनामुळे महिलांना आपल्या उत्पादनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळत असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

Back to top button