स्थानिक

बारामतीच्या ‘महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव; उद्योग क्षेत्रात नवा मानाचा तुरा

कंपनीने सर्वाधिक वर्कशॉप लोड ग्रोथ नोंदवत दरमहा ४५०० पेक्षा अधिक वाहनांचा सेवा भार सांभाळला आहे.

बारामतीच्या ‘महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव; उद्योग क्षेत्रात नवा मानाचा तुरा

कंपनीने सर्वाधिक वर्कशॉप लोड ग्रोथ नोंदवत दरमहा ४५०० पेक्षा अधिक वाहनांचा सेवा भार सांभाळला आहे.

बारामती वार्तापत्र

बारामतीच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणारी कामगिरी महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजने केली आहे. ग्रामीण भागात वाहन विक्री, ग्राहक सेवा आणि विक्रीनंतरच्या सुविधांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत बारामतीतील मारुती सुझुकीचे अधिकृत वितरक महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज यांनी आता राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटविला आहे.

मलेशियातील क्वालालंपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गौरव सोहळ्यात महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजचे व्यवस्थापकीय संचालक नितीन सातव यांचा मारुती सुझुकी कंपनीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. वाहन विक्री, ग्राहक समाधान आणि वर्कशॉप व्यवस्थापन या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजने विशेषतः ग्रामीण भागात ग्राहकांपर्यंत आधुनिक वाहन सेवा पोहोचविण्याचे मोठे काम केले आहे. कंपनीने सर्वाधिक वर्कशॉप लोड ग्रोथ नोंदवत दरमहा ४५०० पेक्षा अधिक वाहनांचा सेवा भार सांभाळला आहे. तसेच विस्तारित हमी विक्रीमध्येही कंपनीने उल्लेखनीय यश मिळवत ६००० ते १२००० रिटेल्सच्या अरेना चॅनेलमध्ये सर्वाधिक टक्केवारीची नोंद केली आहे.

वाहन विक्री क्षेत्रातही महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजने सातत्यपूर्ण कामगिरी करत १२ हजारांपेक्षा अधिक वाहन विक्रीच्या श्रेणीत उल्लेखनीय नोंद केली आहे. ग्राहकांच्या विश्वासावर उभ्या असलेल्या या यशामागे उत्कृष्ट सेवा, तांत्रिक सुविधा आणि ग्राहकांशी असलेले विश्वासाचे नाते महत्त्वाचे ठरले आहे. ग्राहक समाधानाच्या बाबतीतही कंपनीने मोठी आघाडी घेतली असून अरेना आणि नेक्सा या दोन्ही चॅनेलमध्ये सर्वाधिक नेट प्रमोटर स्कोअर मिळवून ग्राहकांचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे.

ग्रामीण भागात वाहन विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजच्या या यशामुळे बारामतीच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे.या गौरव सोहळ्यास राहुल अग्रवाल आणि विवेक सरोदे यांचीही उपस्थिती होती. महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजच्या या यशामुळे बारामतीसह संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Back to top button