बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर उपमुख्यमंत्री;सुनेत्रा पवार
पंचनामे पूर्ण होताच मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून

बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर उपमुख्यमंत्री;सुनेत्रा पवार
पंचनामे पूर्ण होताच मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून
बारामती वार्तापत्र
बारामती मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शनिवारी माळवाडी (ता. बारामती) येथे भेट देत बाधित क्षेत्राची पाहणी केली.
सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना धीर दिला. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येईल. पंचनामे पूर्ण होताच मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून यावेळी करण्यात आली आहे.






