स्थानिक

बारामतीत पाणीपुरवठा पाईपलाईन कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था,स्वस्तिक कंपनीवर कारवाईची मागणी

नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बारामतीत पाणीपुरवठा पाईपलाईन कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था,स्वस्तिक कंपनीवर कारवाईची मागणी

नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून काम करणाऱ्या स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये पाईपलाईन टाकण्यासाठी चांगल्या स्थितीतील रस्ते फोडण्यात आले असून, काम पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्यांची योग्य दुरुस्ती न केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात बारामती नगर परिषदेचे बांधकाम सभापती अमर धुमाळ यांनी दि. २३ जून २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला. स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामाबाबत नगरसेवकांसह नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

पाईपलाईनचे काम करताना रस्ते खोदकामानंतर ते पूर्ववत करण्याबाबत नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या सूचनांचे पालन होत नसून अनेक ठिकाणी रस्ते उंच-खोल व खड्डेमय अवस्थेत असल्याचे सभेत सांगण्यात आले.

यामुळे वाहनचालक, पादचारी तसेच स्थानिक नागरिकांना रोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित कंपनीने कामातील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात आणि वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होत नसल्याने स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

Back to top button