स्थानिक

बारामतीत मान्सूनची दमदार एन्ट्री; पहिल्याच पावसाने नागरिकांना दिलासा

अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर असलेल्या नागरिकांची काही काळ धावपळ

बारामतीत मान्सूनची दमदार एन्ट्री; पहिल्याच पावसाने नागरिकांना दिलासा

अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर असलेल्या नागरिकांची काही काळ धावपळ

बारामती वार्तापत्र 

बारामती शहर आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळी मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावत उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला. दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत असताना सायंकाळी चारच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि सुमारे पाच वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली.

अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर असलेल्या नागरिकांची काही काळ धावपळ उडाली. अनेकांनी दुकानांचा व इमारतींचा आसरा घेतला, तर दुचाकीस्वारांना पावसापासून बचाव करण्यासाठी थांबावे लागले. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचाही वेग मंदावला.

मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बारामती शहरासह परिसरातील विविध भागांत झालेल्या या पावसाने मान्सूनचे उत्साहात स्वागत झाले असून आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Back to top button