स्थानिक

बारामतीत हिंदू साम्राज्य दिन उत्साहात साजरा; छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

उपस्थितांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

बारामतीत हिंदू साम्राज्य दिन उत्साहात साजरा; छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

उपस्थितांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

बारामती वार्तापत्र 

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त साजऱ्या होणाऱ्या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त तसेच पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बारामती शहरातील अशोक नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, न्यायप्रिय राज्यकारभार आणि स्वराज्याच्या आदर्शांचा स्मरण करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमास दीपक पेशवे, विनोद पवार, मंगेश मासाळ तसेच परिसरातील अनेक हिंदू बांधव उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Back to top button