स्थानिक

बारामती शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; हरवलेले व चोरीचे १६ मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात

सर्वत्र कौतुक होत आहे.

बारामती शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; हरवलेले व चोरीचे १६ मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात

सर्वत्र कौतुक होत आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर करत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. चोरीला गेलेले व हरवलेले तब्बल १६ मोबाईल फोन यशस्वीरित्या शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात परत करण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने पोलिसांनी ही शोधमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बारामती शहर पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कारवाईमुळे नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यांचा तांत्रिक तपास करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याची बारामती शहर पोलिसांची बांधिलकी या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले असून, त्वरित तक्रार दिल्यास तांत्रिक तपासाद्वारे मोबाईल शोधण्याची शक्यता अधिक असल्याचेही स्पष्ट केले.

Back to top button