बारामतीतील म. ए. सो.च्या कै. ग. भि. देशपांडे विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी..
२४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत; कु. देवयानी कोकणी राज्य गुणवत्ता यादीत आठवी, बारामती तालुक्यात शहरी विभागात पहिली.

बारामतीतील म. ए. सो.च्या कै. ग. भि. देशपांडे विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी..
२४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत; कु. देवयानी कोकणी राज्य गुणवत्ता यादीत आठवी, बारामती तालुक्यात शहरी विभागात पहिली.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील तब्बल १३८ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी इयत्ता पाचवीचे १४ व इयत्ता आठवीचे १० असे एकूण २४ विद्यार्थी पुणे जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.
या उल्लेखनीय यशामध्ये कु. देवयानी प्रकाश कोकणी (K -3/410) हिने इयत्ता आठवीच्या राज्य गुणवत्ता यादीत आठवे स्थान मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तसेच ती पुणे जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत तिसरी व बारामती तालुक्यात शहरी विभागात प्रथम आली असून तिच्या या यशामुळे विद्यालयाचा गौरव राज्यपातळीवर उंचावला आहे.
इयत्ता पाचवीच्या गुणवत्ता यादीत रुद्र घुले, योगीराज मदने, अर्णव शिंदे, अदिती जगदाळे, सर्वज्ञ जंजिरे, श्रेयश नाळे, प्रांजल रंगाटे, रणवीर बावकर, स्मित भगत, काव्या चांदगुडे, स्वराली नाळे, कार्तिक थोरात, भारती निंबाळकर आणि कैवल्यवीर वाघ या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
तर इयत्ता आठवीच्या गुणवत्ता यादीत देवयानी कोकणीसह प्रियदर्शनी फलफले, उत्कर्षा गावडे, शिवम पानसरे, शिवम कदम, विघ्नेश काळंगे, मृगांक्षी कांबळे, श्वेता राऊत, वैष्णवी गोंजारी आणि राजवीर गावडे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना श्री. संतोष बरळ, श्री. राजेंद्र जगताप, श्री. संतोष शेळके व श्री. चंद्रकांत वसावे यांनी मार्गदर्शन केले. तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना श्री. रविंद्र गडकर, श्री. अभिमन्यू गंभिरे, श्री. मधुकर राठोड, सौ. श्रद्धाराणी मोहिते, सौ. मेधा चिंधे, श्रीमती सविता सणगर आणि श्री. दिपक गायकवाड यांनी परिश्रमपूर्वक मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष मा. श्री. अजयजी पुरोहित, महामात्र डॉ. गोविंदजी कुलकर्णी तसेच शालेय पदाधिकारी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग, उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार, सौ. सुजाता पांडकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्ती परीक्षेतील हे उल्लेखनीय यश म्हणजे विद्यालयातील गुणवत्तापूर्ण अध्यापन, नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक संस्कारांचे द्योतक असून, भविष्यातही अशीच यशस्वी परंपरा अधिक बळकट होईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त होत आहे.






