इंदापूरात मोफत NCMC कार्ड नोंदणी; महिलांसह ज्येष्ठांनी लाभ घ्यावा
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत

इंदापूरात मोफत NCMC कार्ड नोंदणी; महिलांसह ज्येष्ठांनी लाभ घ्यावा
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत
इंदापूर,आदित्य बोराटे –
राज्य शासनाचा महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मोफत एसटी प्रवास योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सावतमाळी नगर (सावतमाळी मंदिरामध्ये) मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
या शिबिरामध्ये पात्र नागरिकांना मोफत एसटी बस प्रवासासाठी आवश्यक असलेले NCMC कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, आधारशी संलग्न असलेला चालू मोबाईल क्रमांक (OTP साठी) तसेच स्वतःची आवश्यक माहिती सोबत आणावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या शिबिराचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीपदादा गारटकर आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा भाजप युवा नेते प्रवीण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच शहराध्यक्ष किरण गाणबोटे, विरोधी पक्षनेते अनिल पवार, नगरसेवक संजय शिंदे, सुधाकर ढगे, गणेश राऊत, नगरसेविका शीतल अतुल शेटे ,शकीला खाजा बागवान आणि सदफ वसीम बागवान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन मयूर मोहन शिंदे (शहराध्यक्ष, ओबीसी मोर्चा, भाजप) आणि आशुतोष पांडुरंग शिंदे (युवा नेते, भाजप) यांनी केले असून, महिला, मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांसह पात्र पुरुषांनीही या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






