क्राईम रिपोर्ट

बारामतीत गोवा बनावटीच्या दारूवर धडक कारवाई; आय-20 कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त 

दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बारामतीत गोवा बनावटीच्या दारूवर धडक कारवाई; आय-20 कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त 

दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बारामती वार्तापत्र 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बारामती पथकाने गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याच्या बेकायदा वाहतूक व साठ्यावर धडक कारवाई करत सुमारे ५ लाख १३ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत हुंडाई आय-20 कार, विदेशी मद्याचे १८ सीलबंद बॉक्स आणि एक अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त पी. पी. सूर्यवंशी, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अधीक्षक अतुल कानडे आणि उपअधीक्षक कसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (५ जुलै) सायंकाळी माळेगाव-सांगवी रोडवरील तावरे फार्म शेजारी, शिवनगर (ता. बारामती) येथे लाल रंगाच्या हुंडाई आय-20 कारची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या घराची झडती घेतली असता गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे १८ सीलबंद बॉक्स आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्ल्यू, मॅकडॉवेल्स नं. १ व्हिस्की, मॅकडॉवेल्स नं. १ सेलिब्रेशन रम आणि रॉयल चॅलेंज या ब्रँडचा समावेश आहे.

या प्रकरणी तुषार रवींद्र कोकरे (रा. कोकरे वस्ती, पानंदरे, ता. बारामती) आणि संदीप विठ्ठल कासार (रा. खारघर, नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अंतर्गत गुन्हा (क्र. ११७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे करीत आहेत.

Back to top button