अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी संस्थेच्या ६५ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला.

अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी संस्थेच्या ६५ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला.
बारामती वार्तापत्र
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी मिलिंद शाह (वाघोलीकर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नूतन कार्यालयामध्ये अद्ययावत व प्रशस्त सभागृह, अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांचे स्वतंत्र कक्ष तसेच आधुनिक सुविधांनी सुसज्ज कार्यालयीन कामकाज विभाग उभारण्यात आला आहे.
कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार विकास शहा (लेंगरेकर), नियामक मंडळाचे सदस्य चंद्रगुप्त शाह (वाघोलीकर), चंद्रवदन शहा (मुंबईकर), विद्युतकुमार शहा, डॉ. हर्षवर्धन व्होरा, सत्यजित शहा (पंदारकर), राहुल शाह (वाघोलीकर), डॉ. जे. जे. शहा, सोनिक शहा (पंदारकर) तसेच बांधकाम समितीचे अध्यक्ष करन शाह (वाघोलीकर) उपस्थित होते.
बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी संस्थेच्या ६५ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. वाढत्या कामकाजामुळे आधुनिक प्रशासकीय कार्यालयाची गरज निर्माण झाली होती. अध्यक्ष जवाहर शाह यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने विविध विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केली असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) यांनी संस्थेच्या विकासकामांची माहिती देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ट्रायपॉड प्रणाली, नवीन रस्ता, प्रशासकीय कार्यालय, कॉलेज ऑफ फार्मसीची भव्य इमारत आणि प्रेरणा भवन यांसारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारल्याचे सांगितले.
या विकासकामांचा लाभ शाळा व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी अध्यक्ष जवाहर शाह, सचिव मिलिंद शाह, खजिनदार विकास शहा तसेच नूतन कार्यालयाच्या अंतर्गत सजावटीचे काम करणारे इंटेरिअर डिझायनर ऋषिकेश चंगेडिया यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. डॉ. सचिन गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. धनंजय बागुल, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. दर्शन शहा, अनेकान्त स्कूलच्या प्राचार्या प्रणाली वडेर, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, विविध शाखांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी तसेच जनरल समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







