आपला जिल्हा

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक : सभासदांच्या भावना जाणून घेण्यासाठी युगेंद्र पवारांचा संवाद

कारखान्याच्या निवडणुकीत कोणत्या रणनीतीने सामोरे जायचे

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक : सभासदांच्या भावना जाणून घेण्यासाठी युगेंद्र पवारांचा संवाद

कारखान्याच्या निवडणुकीत कोणत्या रणनीतीने सामोरे जायचे

बारामती वार्तापत्र

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामतीच्या पश्चिम भागातील कार्यकर्ते आणि सभासदांशी संवाद साधत प्राथमिक आढावा घेतला.
निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सभासदांच्या भावना, अपेक्षा आणि मत जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. विविध भागातील कार्यकर्ते व सभासदांनी या बैठकीत आपली मते मांडली.

पत्रकारांशी संवाद साधताना युगेंद्र पवार म्हणाले, “सध्या ही केवळ प्राथमिक चर्चा आहे. कार्यकर्ते आणि सभासदांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू असून, सर्वांच्या सूचनांचा विचार करून पुढील वाटचाल निश्चित केली जाईल.”

ते पुढे म्हणाले की, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणत्या रणनीतीने सामोरे जायचे, उमेदवारीबाबत काय भूमिका घ्यायची आणि पुढील प्रचाराची दिशा काय असणार, याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवडाभरात घेतला जाईल.

या बैठकीमुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D