शैक्षणिक

उधाणलेल्या आव्हानांतूनच यशाचा किनारा गाठता येतो — तुषार लुंकड

एकूण ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

उधाणलेल्या आव्हानांतूनच यशाचा किनारा गाठता येतो — तुषार लुंकड

एकूण ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

बारामती वार्तापत्र 

“शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी घडवत नाही; त्यासाठी समुद्रही उधाणलेला असावा लागतो. जीवनातील आव्हानांवर मात करत सातत्य, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरच यशाचा किनारा गाठता येतो,” असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा उद्योग निरीक्षक श्री. तुषार लुंकड यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती येथे आयोजित ‘गुणगौरव’ समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

संस्थेचे नियामक मंडळ सदस्य व शाळा समिती अध्यक्ष अजय पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दहावी, बारावी, राज्य शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एम.एम.एस. तसेच प्राथमिक विभागातील मंथन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या एकूण ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

यंदा विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.७८ टक्के, बारावी कला शाखेचा ८२.६० टक्के, वाणिज्य शाखेचा ९५.४५ टक्के, तर विज्ञान शाखेचा १०० टक्के लागला. नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

मनोगतात श्री. लुंकड यांनी, विद्यार्थी म्हणून ज्या शाळेत घडलो त्याच शाळेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून शाळा, पालक आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.

प्रशालेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळवून संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे सांगितले.

अध्यक्षीय समारोपात अजय पुरोहित यांनी, “यश हा प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असून तो अंतिम पूर्णविराम नाही,” असे सांगत विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका पूजा जोग यांनी केले. सूत्रसंचालन संतोष शेळके यांनी, तर आभार रवींद्र गडकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत ज्ञानेश्वर माऊलींच्या **’पसायदान’**च्या सामूहिक गायनाने भक्तिमय वातावरणात झाली.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D