स्थानिक

बारामती नगरपरिषदेतील कंत्राटांवर बनावट पदवीचा संशय?

पाकिस्तानातील ॲक्सॅक्ट कथित बनावट पदवी देणाऱ्या संस्थेच्या प्रमाणपत्राचा वापर..आसिफ खान माजी नगरसेवक यांचा आरोप

बारामती नगरपरिषदेतील कंत्राटांवर बनावट पदवीचा संशय?

पाकिस्तानातील ॲक्सॅक्ट कथित बनावट पदवी देणाऱ्या संस्थेच्या प्रमाणपत्राचा वापर..आसिफ खान माजी नगरसेवक यांचा आरोप

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेच्या विविध विकासकामांच्या कंत्राटांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला असून, एका कंत्राटदाराने कथितपणे पाकिस्तानस्थित ॲक्सॅक्ट या बनावट पदवी प्रकरणाशी संबंधित सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीचा आधार घेऊन अनेक वर्षे नगरपरिषदेची कोट्यवधी रुपयांची कामे मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. माजी नगरसेवक आसिफ खान यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

आरोपानुसार, सोहेल खान या संबंधित व्यक्तीने सादर केलेल्या अभियांत्रिकी पदवीच्या आधारे नगरपरिषदेकडील विविध निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यानंतर अनेक विकासकामांचे कंत्राटे मिळाली.

या काळात त्या पदवीची पडताळणी संबंधित विभागांनी का केली नाही? निविदा मंजूर करताना आवश्यक कागदपत्रांची छाननी झाली का? आणि पात्रता तपासण्यात त्रुटी का राहिली? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आसिफ खान यांनी काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी संबंधित व्यक्तीला राजकीय पाठबळ दिल्याचा आरोपही यावेळी केला आहे.

खान पुढे म्हणाले की, पाकिस्तानस्थित ॲक्सॅक्ट या बनावट पदवी प्रकरणाशी संबंधित सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीच्या आधारे शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची कंत्राटे मिळवली असतील, तर त्यामुळे पात्र आणि शिक्षित अभियंते व कंत्राटदार संधीपासून वंचित राहिले आहे. निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित पदवी बनावट असल्याचे सक्षम तपासातून सिद्ध झाल्यास फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर, सरकारी यंत्रणेची दिशाभूल आणि अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हे नोंद करण्यात यावे. तसेच, कागदपत्रांची पडताळणी न करता मंजुरी देणाऱ्या अधिकारी किंवा संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी खान यांनी केली आहे.
——–
खान यांची प्रकरणात खालील मुद्द्यांची चौकशी करावी
संबंधित पदवीची सत्यता का पडताळण्यात आली नाही?
निविदा प्रक्रियेदरम्यान पात्रतेची तपासणी कोणी केली?
कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे किती कामे मंजूर झाली?
त्या कामांचे एकूण आर्थिक मूल्य किती होते?

संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींची भूमिका काय होती?
नगरपरिषदेला किंवा सार्वजनिक निधीला आर्थिक नुकसान झाले का? या सर्व जणांची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी पाकिस्तानस्थित ॲक्सॅक्ट या बनावट पदवी घेणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

तसेच आसिफ खान यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर संवाद साधला आहे

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D