स्थानिक

पुणे-बारामती महामार्गावर एसटी बसचा अपघात टळला; सर्व प्रवासी सुखरूप

सुमारे 12 फूट खोल खड्ड्यात उतरली.

पुणे-बारामती महामार्गावर एसटी बसचा अपघात टळला; सर्व प्रवासी सुखरूप

सुमारे 12 फूट खोल खड्ड्यात उतरली.

बारामती वार्तापत्र 

पुणे-बारामती महामार्गावरील जळगाव काप व करावागज परिसरात शुक्रवारी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात एम-एच- १३ -६०८३ क्रमांकाची एसटी बस रस्त्यालगत सुमारे 12 फूट खोल खड्ड्यात उतरली.

या घटनेत बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. बसमधील सर्व प्रवासी तसेच चालक सुखरूप असून, सुदैवाने कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतूक मंदावली होती. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D