स्थानिक

बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना जामीन मंजूर

पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया नियमानुसार सुरू राहणार आहे.

बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना जामीन मंजूर

पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया नियमानुसार सुरू राहणार आहे.

बारामती वार्तापत्र 

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पदाधिकारी मंगेश जगताप यांच्याविरोधात एका तरुणीच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्याप्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

तक्रारदार तरुणीच्या फिर्यादीनुसार, दीर्घकाळ लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी संबंध ठेवण्यात आले, विश्वास संपादन करून तिची फसवणूक करण्यात आली तसेच तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा गुन्हा सुरुवातीला पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. मात्र, घटनास्थळाच्या अधिकारक्षेत्रानुसार पुढील तपासासाठी हा गुन्हा माळेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.दरम्यान, मंगेश जगताप यांनी अटकपूर्व दिलासासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला.
——
फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीतील घटनांबाबत एफआयआर नोंदविण्यास तब्बल 14 वर्षांचा विलंब झाला आहे. तसेच उपलब्ध कागदपत्रे आणि नोंदींच्या आधारे संबंधित कायदेशीर तरतुदी लागू होत नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. याशिवाय तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही न्यायालयासमोर दर्शविण्यात आली. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे –. ॲड. सचिन झालटे-पाटील( जगताप यांचे वकील)

या प्रकरणाचा तपास माळेगाव पोलीस ठाण्याकडून सुरू असून, पुढील तपासानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे. न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन हा आरोपांवरील अंतिम निर्णय नसून, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे वकील यांनी स्पष्ट केले आहे..

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D