इंदापूर

अविनाश इंडियन गॅस एजन्सीकडून ई-केवायसीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

३ व ४ ऑगस्ट रोजी बळीराजा सांस्कृतिक भवन येथे शिबिर; ई-केवायसी न केल्यास सबसिडी व गॅस कनेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता

अविनाश इंडियन गॅस एजन्सीकडून ई-केवायसीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

३ व ४ ऑगस्ट रोजी बळीराजा सांस्कृतिक भवन येथे शिबिर; ई-केवायसी न केल्यास सबसिडी व गॅस कनेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता

वालचंदनगर | प्रतिनिधी

अविनाश इंडियन गॅस एजन्सी, वालचंदनगर यांच्या वतीने उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी तसेच सर्व घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या ग्राहकांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी दि. ३ व ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत बळीराजा सांस्कृतिक भवन, कृषी उत्पन्न बाजार समिती (शेजारी), वालचंदनगर येथे विशेष ई-केवायसी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एजन्सीच्या माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या ग्राहकांना भविष्यात एलपीजी गॅस सबसिडी बंद होणे तसेच गॅस कनेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी संबंधित ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिराचा लाभ घेऊन सर्वांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करावी, अशी नम्र विनंती अविनाश इंडियन गॅस एजन्सी, वालचंदनगर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D