उपमुख्यमंत्री;सुनेत्रा पवार यांची ‘सहयोग’वर जनसुनावणी नागरिकांच्या तक्रारी ऐकून अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
नवीन वाहनाचे पूजनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले

उपमुख्यमंत्री;सुनेत्रा पवार यांची ‘सहयोग’वर जनसुनावणी
नागरिकांच्या तक्रारी ऐकून अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
नवीन वाहनाचे पूजनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी बारामती येथील ‘सहयोग’ निवासस्थानी नागरिकांच्या गाठीभेटी घेत विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी बारामती शहरासह परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शासकीय कामकाज, आरोग्य सेवा तसेच इतर नागरी सुविधांबाबतच्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची सुनेत्रा पवार यांनी बारकाईने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा मिळेल, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
नागरिकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात अधिक प्रभावी समन्वय ठेवून काम करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. आपल्या समस्या प्रत्यक्ष उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने समाधान व्यक्त करत अनेक नागरिकांनी सुनेत्रा पवार यांचे आभार मानले.
याच कार्यक्रमादरम्यान बारामती नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक तथा मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या नवीन वाहनाचे पूजनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.







