बारामतीतील आर बी कॉम्प्युटर्सचे नव्या ठिकाणी स्थलांतर
४७ वर्षांची विश्वासाची परंपरा आता अधिक आधुनिक सुविधांसह

बारामतीतील आर बी कॉम्प्युटर्सचे नव्या ठिकाणी स्थलांतर
४७ वर्षांची विश्वासाची परंपरा आता अधिक आधुनिक सुविधांसह
बारामती वार्तापत्र
ग्राहकांचा विश्वास, प्रामाणिक सेवा आणि दर्जेदार कामाच्या बळावर चार दशकांहून अधिक काळ यशस्वी वाटचाल करणाऱ्या आर बी कॉम्प्युटर्सने आपल्या दुकानाचे नव्या प्रशस्त ठिकाणी स्थलांतर केले आहे. अनेक वर्षे बारामतीकरांनी जपलेल्या विश्वासाला अधिक बळ देत आता आधुनिक सुविधा आणि अधिक चांगली ग्राहकसेवा देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
स्व. आकलभाई हाजीमहम्मद हुसेन यांनी १९७९ मध्ये फलटण येथे या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. प्रामाणिकपणा, अचूक काम आणि ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते या मूल्यांच्या आधारावर त्यांनी व्यवसायाची मजबूत पायाभरणी केली. त्यानंतर २००२ पासून बारामतीच्या कचेरी परिसरात आर बी कॉम्प्युटर्सने सेवा सुरू केली आणि अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन केला.
शासकीय व न्यायालयीन कागदपत्रे, झेरॉक्स, प्रिंटिंग, ऑनलाइन सेवा, लॅमिनेशन, फोटो, स्मार्ट कार्ड, अर्ज भरणे अशा विविध सेवांसाठी आर बी कॉम्प्युटर्स हे बारामतीतील एक विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेक ग्राहकांचे तीन पिढ्यांचे नाते आजही या संस्थेशी कायम असल्याचे विशेष मानले जाते.
ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आता दुकानाचे स्थलांतर शॉप क्रमांक ९, सतीश गृहनिर्माण, संभव इलेक्ट्रिकल्स शेजारी, प्रशासकीय भवन रिंगरोड, जुनी कचेरी समोर, बारामती येथे करण्यात आले आहे. नव्या ठिकाणी प्रशस्त जागा, आधुनिक यंत्रसामग्री आणि अधिक वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी संचालकांनी सांगितले, “गेली ४७ वर्षे ग्राहकांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. स्व. आकलभाई हाजीमहम्मद हुसेन यांनी रुजविलेली प्रामाणिक सेवा आणि विश्वासाची परंपरा पुढे नेत, नव्या ठिकाणीही त्याच आत्मीयतेने आणि अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे.”
आर बी कॉम्प्युटर्समध्ये जंबो व कलर झेरॉक्स, अर्जंट रबरी शिक्के, प्रिंट-स्कॅन, कलर फोटो, लॅमिनेशन, ऑनलाइन फॉर्म, स्मार्ट कार्ड यांसह विविध सेवा उपलब्ध असून, ग्राहकांनी नव्या ठिकाणी भेट देऊन पूर्वीप्रमाणेच विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






