माळेगाव कारखान्यात ‘व्हाईस’ कोण? उद्या होणार फैसला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

माळेगाव कारखान्यात ‘व्हाईस’ कोण? उद्या होणार फैसला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
निवडीकडे सभासदांसह तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदाची निवड उद्या होणार असून, या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे. संचालक मंडळातील कोणत्या संचालकाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यातील महत्त्वाचा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने विविध क्षेत्रांत वाटचाल केली. त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कारखान्याचे नेतृत्व करत आहेत.
व्हाईस चेअरमनपदासाठी संचालक मंडळातील कोणत्या संचालकाची निवड केली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी संभाव्य नावांवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होते, याची उत्सुकता सभासदांमध्ये निर्माण झाली आहे.
कारखान्याच्या दैनंदिन प्रशासकीय आणि धोरणात्मक कामकाजात व्हाईस चेअरमनची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या पदासाठी होणारी निवड ही केवळ पदाची निवड न राहता कारखान्याच्या आगामी कारभाराच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे.
उद्याच्या निवडीनंतरच माळेगाव कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडीकडे सभासदांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






