स्थानिक

‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमली बारामती; हुतात्मा स्तंभाला अभिवादन

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला उजाळा

‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमली बारामती; हुतात्मा स्तंभाला अभिवादन

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला उजाळा

बारामती वार्तापत्र

ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने बारामतीतील माजी स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या वतीने बारामती शहरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण यावेळी करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा आणि देशभक्तीच्या प्रेरणेचा जागर करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी माजी स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

ऑगस्ट क्रांती दिन हा स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक दिवस असून, या निमित्ताने हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला उजाळा देण्यात आला.

Back to top button