स्थानिक

बारामतीत मांजाविरोधात वाहतूक पोलिसांचा एल्गार; दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी जनजागृती मोहीम

दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे आवाहन; रस्त्यावर मांजा आढळल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन

बारामतीत मांजाविरोधात वाहतूक पोलिसांचा एल्गार; दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी जनजागृती मोहीम

दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे आवाहन; रस्त्यावर मांजा आढळल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात वाहन चालवत असताना मांजा कापल्याच्या घटना समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून आज विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी दुचाकीस्वारांना मांजापासून सावध राहण्याचे आवाहन केले.

रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मांजामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. विशेषतः गळ्याला किंवा शरीराच्या इतर भागांना मांजा लागल्यास मोठी इजा होऊ शकते. त्यामुळे वाहन चालवताना दुचाकीस्वारांनी अधिक काळजी घ्यावी, असे पोलिसांनी सांगितले.

तसेच रस्त्यावर मांजा आढळून आल्यास नागरिकांनी स्वतः तो हाताळण्याऐवजी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. धोकादायक मांजाचा वापर, विक्री किंवा साठवणूक करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या या जनजागृती मोहिमेमुळे वाहनचालकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत होत आहे.

Back to top button