क्राईम रिपोर्ट

गरोदर महिलेच्या खून-बलात्कार प्रकरणाचा अवघ्या दोन तासांत छडा; बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी!

विरोध केला म्हणून जीव घेतला?

गरोदर महिलेच्या खून-बलात्कार प्रकरणाचा अवघ्या दोन तासांत छडा; बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी!

विरोध केला म्हणून जीव घेतला?

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील पिंपरे परिसरात एका गर्भवती महिलेवर हल्ला करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने अत्याचाराला विरोध केल्यानंतर आरोपीने तिचा गळा आवळल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी २६ वर्षीय संशयित आरोपीला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. महिलेचा मृतदेह घरातील एका खोलीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.

दोन तासांत संशयित पोलिसांच्या ताब्यात

घटनेचा तपास सुरू असतानाच पोलिसांना संशयित व्यक्तीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरल्याचे दिसून आले.

तपासादरम्यान महिलेवर हल्ला केल्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्याचे आणि महिलेने विरोध केल्यानंतर तिचा गळा आवळण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

वैद्यकीय तपासणीत गंभीर दुखापती

पीडित महिला गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत नमूद करण्यात आले आहे. तिच्या डोक्याला, मानेवर तसेच शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापती आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे.

या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Back to top button