बारामतीतील भिगवण रस्त्यावर अपघात दिसताच युगेंद्र पवार थांबले; जखमी महिलेला तातडीची मदत!
स्वतःची गाडी उपलब्ध करून रुग्णालयात पाठवले

बारामतीतील भिगवण रस्त्यावर अपघात दिसताच युगेंद्र पवार थांबले; जखमी महिलेला तातडीची मदत!
स्वतःची गाडी उपलब्ध करून रुग्णालयात पाठवले
बारामती वार्तापत्र
बारामतीच्या एमआयडीसी परिसरातील गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक होऊन एक महिला जखमी झाली. अपघाताची घटना निदर्शनास येताच त्या मार्गावरून जात असलेले युवानेते युगेंद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला मदतीचा हात दिला.
अपघातानंतर महिला जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात येताच युगेंद्र पवार यांनी वेळ न दवडता स्वतःची गाडी रुग्णालयात नेण्यासाठी उपलब्ध करून दिली. एवढेच नव्हे तर त्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यालाही जखमी महिलेसोबत रुग्णालयात पाठवून उपचारासाठी आवश्यक ती मदत मिळवून दिली.
युगेंद्र पवार यांच्या या तत्परतेमुळे जखमी महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यास मदत झाली. अपघाताच्या प्रसंगी केवळ पाहत न राहता तातडीने मदतीसाठी पुढे येण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
अपघाताच्या वेळी ‘मदतीचा हात’ किती महत्त्वाचा ठरतो, याचा प्रत्यय गदिमा रोडवरील या घटनेतून आला. जखमी व्यक्तीला वेळेत वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि याच भावनेतून युगेंद्र पवार यांनी तत्परतेने मदत केल्याचे दिसून आले.






