स्थानिक

बारामतीत अजितदादांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ; शाळा क्रमांक ८ मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज

बारामतीत अजितदादांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ; शाळा क्रमांक ८ मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज

बारामती वार्तापत्र 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क अधिकारी सुरज देवकाते यांच्या वतीने बारामती नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या वह्या, लेखन साहित्य तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्याची कमतरता भासणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार मिळावा, तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शिक्षणाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत मिळावी आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या भावनेतून सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे सुरज देवकाते यांनी सांगितले.

अजितदादांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात असा संदेश देण्यात आला.

शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, शिक्षणाला मदत देण्याची ही सकारात्मक परंपरा पुढेही सुरू राहावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Back to top button