माजी नगरसेवक संतोष गालिंदे यांचे दुःखद निधन; उपचारानंतर घरी परतले, रात्री पुन्हा प्रकृती बिघडली
अटॅक आल्याची माहिती सध्या प्राथमिक स्वरूपाची आहे.

माजी नगरसेवक संतोष गालिंदे यांचे दुःखद निधन; उपचारानंतर घरी परतले, रात्री पुन्हा प्रकृती बिघडली
अटॅक आल्याची माहिती सध्या प्राथमिक स्वरूपाची आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीचे माजी नगरसेवक संतोष गालिंदे यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने बारामती शहरातील मित्रपरिवार, नातेवाईक, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील सहकारी आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने संतोष गालिंदे यांना लोणावळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मोठ्या स्वरूपाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर काही काळ त्यांना रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
उपचारानंतर काल संतोष गालिंदे बारामतीतील आपल्या राहत्या घरी परतले होते. घरी परतल्याची माहिती मिळताच मित्रमंडळी, नातेवाईक आणि परिचितांनी त्यांची भेट घेण्यासाठी धाव घेतली. उपचारानंतर ते घरी परतल्याने कुटुंबीय आणि परिचितांना काहीसा दिलासा मिळाला होता.
मात्र, रात्री उशिराच्या सुमारास त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयाकडे जात असतानाच त्यांना अटॅक आल्याचे प्राथमिक स्वरूपात बोलले जात आहे. त्यानंतर त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, त्यांच्या निधनाचे नेमके वैद्यकीय कारण अधिकृत वैद्यकीय अहवाल किंवा कुटुंबीयांकडून स्पष्ट झाल्यानंतरच निश्चित होणार आहे. अटॅक आल्याची माहिती सध्या प्राथमिक स्वरूपाची आहे.






