स्थानिक

“वाढदिवसाचा आनंद मुक्या जीवांच्या सेवेतून! दुष्काळात गोमातेला चाऱ्याचा आधार; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम!”

माणुसकीचा हात... मुक्या जीवांच्या घासासाठी!

“वाढदिवसाचा आनंद मुक्या जीवांच्या सेवेतून! दुष्काळात गोमातेला चाऱ्याचा आधार; विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम!”

माणुसकीचा हात… मुक्या जीवांच्या घासासाठी!

बारामती वार्तापत्र

सध्या परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे माणसांसह मुक्या जनावरांनाही चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत गोमातेच्या सेवेसाठी पुढाकार घेत विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने चारा वाटपाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेला हा सेवाभावी उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

बारामतीचे हृदयसम्राट म्हणून परिचित असलेले ॲड. भार्गवदादा पाटसकर यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा मंडळाचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरला.

जळगाव, बारामती येथील ‘माँ कामधेनू गोसेवा संघ’ गोशाळेत आयोजित या कार्यक्रमात प्रशांत कुचेकर आणि सलीम भाई सय्यद यांच्या शुभहस्ते गोशाळेतील जनावरांना चारा वाटप करण्यात आले. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत मुक्या जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे गोशाळेतील जनावरांना मोठा आधार मिळाला.

विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची भूमिका नेहमीच विविध उपक्रमांतून मांडली जाते. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठीही पुढाकार घेणे, ही खऱ्या अर्थाने सामाजिक संवेदनशीलतेची ओळख असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष चिऊशेठ जंजिरे, कार्याध्यक्ष नरेंद्र भाऊ मिसाळ, सदस्य विठ्ठल शेठ आगवणे, पवन राजे बनसोडे, गरुड कमांडो नेताजी बुरुंगले फौजी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी सकारात्मक आणि उपयुक्त करण्याचा आनंद वेगळाच असतो. दुष्काळाच्या सावटात मुक्या जीवांची भूक भागविण्यासाठी केलेला हा प्रयत्न माणुसकी, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देणारा ठरला.

Back to top button