स्थानिक

बारामतीत पोलिओविरोधात आरोग्य विभाग सज्ज! ३६ हजार ९३७ बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट; ३११ बूथ कार्यरत!

सांगवीत उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ! 

बारामतीत पोलिओविरोधात आरोग्य विभाग सज्ज! ३६ हजार ९३७ बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट; ३११ बूथ कार्यरत!

सांगवीत उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ!

बारामती वार्तापत्र 

बालकांना पोलिओपासून सुरक्षित ठेवण्यासाठी बारामती तालुक्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. सांगवी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देऊन तालुकास्तरीय मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

या मोहिमेत बारामती तालुक्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील तब्बल ३६ हजार ९३७ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी आरोग्य विभागाने ३११ लसीकरण बूथ आणि ७८२ कर्मचाऱ्यांचे नियोजन केले आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जीवन सरतापे यांनी, एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

घराघरांत पोहोचणार आरोग्य पथके!

लसीकरणाच्या दिवशी बूथवर न आलेल्या बालकांसाठी २३, २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी गृहभेटी देऊन पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. यासाठी २७२ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि चेक पोस्टवर ४ ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत. तसेच १६ फिरती विशेष पथके आणि स्थलांतरित मजूर, ऊसतोड मजूर व त्यांच्या बालकांसाठी १५ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळीही विशेष पथकांमार्फत लसीकरण केले जाणार आहे.

स्थलांतरित मजुरांच्या बालकांवरही विशेष लक्ष!

ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार आणि स्थलांतरित कुटुंबांतील बालकांपर्यंत पोलिओ लसीकरण पोहोचविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने आणि सभापती किरण तावरे यांनी केले.

यावेळी गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जीवन सरतापे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश राठोड, विस्तार अधिकारी सुनील जगताप, सांगवीचे माजी सरपंच भानुदास जगताप, सामाजिक कार्यकर्ते बाळासो घाडगे, अंकुश तावरे, अरुण लोंढे, जन आरोग्य समितीचे पदाधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button