इंदापूर

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे चक्क सुर फाट्या च्या मैदानात

राज्यमंत्र्यांनी घेतला सूर फाट्या खेळण्याचा आनंद.

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे चक्क सुर फाट्या च्या मैदानात

राज्यमंत्र्यांनी घेतला सूर फाट्या खेळण्याचा आनंद.

इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

नेहमीच आपल्या कामात व्यस्त असणाऱ्या राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री यांनी थोडा विरंगुळा म्हणून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी रस्त्या लगत सूर-फाट्या खेळण्याचा आनंद घेतला.

राज्यमंत्री भरणे हे नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतात कोरोनाच्या महामारी मध्ये ते अहोरात्र काम करीत आहेत,त्यांच्यावरती सोलापूरची पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे, त्यामुळे अठरा-अठरा तास कामात व्यस्त असताना आज अशाच व्यस्त कामातून इंदापूर हुन भरनेवाडीला जात असता निमगाव या ठिकाणी काही युवक नागपंचमीनिमित्त स्त्यालगत असणार्‍या मोकळ्या मैदानात खेळत असताना राज्यमंत्री भरणे यांना ते दिसले त्यांनी त्वरित आपली गाडी थांबवून खेळण्याचा आनंद घेतला व यानंतर या युवकांना कोरोना संदर्भात त्यांच्या गावातील माहिती घेऊन काळजी घ्या काळजी करू नका असाही सल्ला त्यांनी यावेळी येथील युवकांना दिला सध्या राज्यमंत्री भरणे यांचा व्हिडीओ इंदापूर तालुक्यातील सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे.

Back to top button